एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या ४० आमदारांनी तेव्हा हिंदुत्वासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत जात आहोत, असे म्हंटले होते. त्या आमदारांमध्ये सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश होता. (Sattar’s loss deal? There is a possibility of losing the ministerial post given to Shinde in the Thackeray government)
तुम्ही खरचं हिंदुत्वासाठी बंडखोरांसोबत गेलात का? अशा खोचक शब्दांत अब्दुल सत्तार यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ यादीतून सत्तार यांचे नाव गायब असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच अब्दुल सत्तार यांनी थेट दिल्ली गाठली.
मंत्रीमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. परंतु मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार लॉबिंग करत असल्याचे पाहायला मिळाले. अब्दुल सत्तार पण दिल्लीला गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सत्तार यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीमंडळ यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याची कुणकुण लागली असावी म्हणूनच त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत, असे बोलले जाते.
तुम्हाला मंत्रीपद मिळणार का? असं विचारण्यात आल्यावर अब्दुल सत्तार त्यावर म्हणाले की, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घेताना अनेक अडचणी येतात. त्यांना आम्हाला मंत्री करण्यात काही अडचणी येत असेल. तर ते त्या अडचणीप्रमाणे निर्णय घेतील. आम्ही कोणतीही अट ठेवून एकनाथ शिंदे सोबत गेलेलो नाही.’
राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत होणाऱ्या दिरंगाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात वाटाघाटी झाल्या असतील,असे मला वाटते.’
दोन- तीन दिवसात नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि तीन तारखेच्या आत शपथविधी समारंभ पण होईल. तीन तारखेच्या आत शंभर नव्हे तर दोनशे टक्के शपथविधी होईल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
२४ तासांत ‘ते’ ट्विट डिलीट करा; स्मृती इराणींच्या याचिकेवर दिल्ली कोर्टाने काॅंग्रेस नेत्यांना फटकारले
ओपनिंग डेला विक्रांत रोनाने ठेवली लाज तर शमशेरा ठरला सुपरफ्लॉप, वाचा कमाईची आकडेवारी
शिंदे गटानं आरपीआयमध्ये विलीन व्हावं; रामदास आठवलेंची थेट शिंदे गटाला ऑफर