प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर प्रेक्षकांची ही उत्सुकता कायम ठेवत नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. टीझरला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होताच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधत प्रेक्षकांच्या भेटीला आणला गेला आहे. या ट्रेलरमध्ये हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान स्वराज्यातील मोहिमा आणि त्या काळच्या घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा अशा प्रवीण तरेडेंच्या दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते.
याचबरोबर ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव म्हणून प्रवीण तरेडेंची दमदार अंदाजात एंट्री झाली आहे. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट अशा अनेक डायलॉगने सरसेनापतीचा ट्रेलर भरलेला आहे. विशेष बाब म्हणजे या ट्रेलरने चाहत्यांचा थरकाप उडवला आहे.
दरम्यान, ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अनेक लढाया जिंकल्या. या चित्रपटात मराठा साम्राज्य त्यांच्या नजरेतून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले आहे. तसेच या चित्रपटात त्यांनी सरसेनापती हंबीरराव यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी याआधी ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे गाजलेले चित्रपट केले आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट महाराष्ट्रात फार लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाचा हिंदीत ‘अंतिम’ या नावाने रिमेक करण्यात आला. तर या चित्रपटात सलमान खान व आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत होते.
महत्त्वाच्या बातम्या
..तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे रहायला आले होते; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट
नेहा शर्माच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा
VIDEO: नेहा शर्माचा सेक्सी जिम व्हिडिओ पाहून चाहतेही झाले थक्क, बोल्ड अंदाजात करत आहे व्यायाम
करोडपती भिकारी! जंगम मालमत्ता, आलिशान बंगला, अफाट बँक बॅलन्स, तरीही मागतो भीक