sarpanch offer to people for grocerry | यंदाची दिवाळी सर्वांसाठीच खुप खास आहे, कारण अनेक ग्रामपंचायतींकडून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. दिवाळीनिमित्त या खास योजना राबवल्या जात आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गावच्या सरपंचांनीही एक खास योजना गावकऱ्यांसाठी आणली आहे.
घरपट्टी भरा आणि त्याच पैशात साखर घेऊन जा अशी योजना घाटणे गावचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी आणली आहे. या योजनेमुळे गावकरी सुद्धा खुश झाले असून ते घरपट्टी भरुन साखर घेऊन जात आहे. ग्रामस्थांनी या संधीचा फायदा घेऊन आपली दिवाळी गोड करावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घाटणे ग्रामपंचायतची विशेष योजना योजना !
घरपट्टी भरा आणि त्याच पैश्यात मिळवा साखर ..!
१) भूमिहीन कुटुंबाना प्रत्येकी ५ किलो साखर मोफत
२) ०० ते ७०० रुपये पट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रति किलो साखर ३० रूपयांत मिळणार
३) ७०० ते २००० रुपये पट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रती किलो साखर २३ रुपयांत
४) २००० ते ३३०० रुपये पट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रती किलो साखर १५ रुपयांत
५) ३३०० ते ४१०० हजार पेक्षा जास्त पट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रती किलो साखर ७ रुपयांत
६) ४१०० च्या पुढे घर पट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांना ५० किलोचे साखरचे पोते मोफत मिळणार
ग्रामस्थांनी या संधीचा फायदा घेत आजच आपली घरीपट्टी भरून दिवाळी गोड करावी !
दरम्यान, शिरसोली वावदडा येथील ग्रुप ग्रामपंचायतीत सुद्धा सरपंचांनी अशाच प्रकारची ऑफर दिली आहे. घरपट्टी भरा आणि पाचशे रुपयांचा किराणा घेऊन जा अशी ऑफर त्यांनी गावकऱ्यांना दिली आहे. दिवाळी सणात योजना सुरु झाल्याने गावकरी घरपट्टी भरण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे.
पाचोरा रस्त्यावर वावडा आणि बिलखेडा या दोन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेकांची घरपट्टी, पाणीपट्टी थकलेली होती. त्यामुळे ती वसूल करण्यासाठी सरपंच राजेश वाडेकर यांनी भन्नाट शक्कल लढवत ही योजना सुरु केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
MS Dhoni : मला वर्ल्डकपमध्ये घेतलं नाहीये त्यामुळे.., सामन्यापुर्वीच धोनीचे हैराण करणारे वक्तव्य, चाहतेही भावूक
IND Vs PAK : टी २० वर्ल्डकपमधला भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे होणार रद्द? समोर आली ‘ही’ मोठी माहिती
bjp : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा मोठी फूट; तब्बल चार आमदार नारायण राणेंच्या संपर्कात