भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यातच आता त्यांनी दिल्ली मध्ये पत्रकार परिषद घेऊन अलिबागच्या 19 बंगल्याचा कर रश्मी ठाकरे का भरतात?त्यांचा त्या बंगल्यांशी काय संबंध? तेच बंगले चोरी कसे झाले?असे आरोप केले. यावर आता कोर्लई गावच्या सरपंचांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे सोमय्या यांनी केलेले आरोप खरे की खोटे याबाबत माहिती समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अलिबागच्या बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे यांच्या नावे भरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हते तर, मालमत्ता कर का भरला, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला,आणि मला जोड्यांनी का मारणार, असं ते म्हणाले.
तसेच यामध्ये रश्मी ठाकरे यांचे पार्टनर मनीषा रवींद्र वायकरयांनी देखील कर भरला आहे. अशी माहिती समोर आणली. यावेळी त्यांनी अलिबागचे 19 बंगले हे ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय राऊत आता जोड्याने कोणाला मारणार?असा सवाल सोमय्यांनी केला.
तसेच सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
या 19 बंगल्यांचा 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे.
रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची माफी का मागितली? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.
त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी यासंदर्भात माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे, ते म्हणाले, प्रत्यक्षात 19 बंगले नव्हते, 18 बंगले होते, अन्वय नाईक यांनी घेतलेल्या जागेवर 18 बंगले होते. खरेदी केल्यानंतर अन्वय नाईक यांनी ती घरं पाडली.
ही घरं पाडून रश्मी ठाकरे, मनिषा वायकरांनी विकली. पूर्वी बंगले असल्यानं ठाकरे यांनी घरपट्टी भरली. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितली नाही. अशी माहिती कोर्लई गावच्या सरपंचानी दिली. सरपंचांनी सोमय्यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे.