Share

‘राजा’ने कर्तृत्ववान सरदारांचा सन्मान राखला पाहिजे; वसंत मोरेंनी पोस्ट केलेल्या पत्राने चर्चांना उधान

vasant more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला. त्यानंतर पक्षाने मोरेंविरोधात मोठं पाऊल उचललं.

मोरे यांना थेट पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर मोरे हे राज ठाकरे त्याच बरोबर मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. अखेर त्या नंतर मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली अन् त्यांची नाराजी दूर झाली. तेव्हा पासून वसंत मोरे हे चर्चेत आहेत.

अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा पार पडली. त्या सभेत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागची कारण स्पष्ट करण्यात आली. सोबतच राज ठाकरे यांनी भाजप सह महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.

पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडल्यानंतर मोरेंनी त्यांची वेळ मागितली होती. मात्र, ठाकरे न भेटताच निघून गेले. यामुळे पुन्हा एकदा मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. अजूनही राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चाना उधाण आले.

तर दुसरीकडे आता एका पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांना एक पत्र आलं होतं. ते पत्र आता चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांनी मोरे यांना एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र मोरेंनी त्यांच्या ट्वीटरवरून शेअर देखील केलं आहे.

दरम्यान, मोरेंनी शेअर केलेल्या पत्रातील मजकूर चर्चेचा विषय बनला आहे. संजय नहार यांनी मोरेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पक्षासाठी वसंत मोरे यांच्यासारखा कर्तृत्ववान सरदार महत्वाचा असल्याचंही या पत्रातून सांगण्यात आलं आहे. ‘राजाने कर्तृत्ववान सरदाराचा सन्मान राखला पाहिजे,’ असं देखील पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी करताच केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले…
शेणाचा अनोखा फायदा! ओडिशातील गृहिणीने सुरू केला शेणापासून ‘हा’ व्यवसाय, कमावते बक्कळ पैसा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now