सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहे. या मोसमात मुंबईच्या संघाने भलेही खराब प्रदर्शन केले असेल, परंतु सारा बहुतेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती आणि ती तिच्या लूकमुळे चर्चेत होती. आता साराचा नवा लूक समोर आला आहे.
यावेळी सारा तिच्या पारंपरिक स्टाईलमध्ये दिसली. तिने साडी नेसली आहे आणि टिकली व दागिने घालून पारंपारिक मराठमोळी वेशभूषा केली आहे. सचिनचे कुटुंबीय एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.
या लग्नात सारा तेंडुलकरनेही कलश घेऊन काही विधी केल्या. यावरून असा अंदाज लावला जात आहे की हे लग्न त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाचे होते. या लग्नात सारा पूर्णपणे पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत दिसली. तिच्या दागिन्यांपासून गजरा, साडीपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये मराठी शैली दिसून आली. ती पहिल्यांदा साडीत दिसली आहे.
लग्नाच्या इतर फंक्शन्समध्येही सारा व्हाइट सुटमध्ये दिसली. यादरम्यान तिची इतर नातेवाईकांशी भेट झाली. सारा तिच्या अभ्यासानिमित्त बराच काळ लंडनमध्ये राहिली होती. यादरम्यान ती काही काळासाठी भारतात येत असते. लग्नात सचिन तेंडुलकरही नवविवाहित जोडप्यासोबत दिसला.
मुंबईतील जेडब्ल्यू हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाचे फोटो फोटोग्राफर समीर वसईकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. या लग्नात सचिन खूप आनंदी दिसत होता. सर्व नातेवाईकांसोबत त्याने चांगला वेळ घालवला. सचिनचे मस्ती करतानाचे फोटोही समोर आले आहेत.
लग्नात सचिनने वेगवेगळ्या विधींना हजेरी लावली आणि संपूर्ण लग्न मराठी रितीरिवाजानुसार पार पडले. लग्नात सचिन निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसला. सारा तेंडुलकर हातात कलश घेऊन लग्नाचे विधी पार पाडताना दिसली. त्याच्यासोबत इतर मुलीही कलश घेऊन तिच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहेत. पण पहिल्यांदाच साराला मराठमोळ्या अंदाजात पाहून चाहते घायाळ झाले आहेत. अनेकांनी तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ
बिहारच्या राजकारणात खळबळ! आमदारांना पटना सोडण्यास बंदी; जेडीयू-भाजपचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर
गुजरात आणि राजस्थानमधील एलिमीनेटर सामना रद्द होण्याच्या मार्गावर, धक्कादायक कारण आले समोर
आजपासून सुरू होणार महिला आयपीएलचा थरार, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहायचे हे सामने