Share

समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला दिलेली एकमेव जागा परत घेतली? वाचा सत्य काय…

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उत्तरप्रदेशातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला अनुपशहर हा मतदारसंघ जाहीर करून तेथे उमेदवारही निश्चित झाला. परंतु काही स्थानिक बातम्यांनुसार समाजवादी पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीकडून जागा परत घेतल्याची निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर सध्या ज्या सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत. त्या खोट्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच आज आमची समाजवादी पक्षाचं प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथे इतर जागांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला ज्या पक्षांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्या सर्वच पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित असतील. या बैठकीत प्रामुख्यानं इतर जागांबाबत अखिलेश यादव यांच्या सोबत चर्चा होणार असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून समाजवादी पक्षानं जागा काढून घेतल्याबाबत सोमवारी चर्चा रंगल्या होत्या. नंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला ट्विटरच्या माध्यमातून लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत भातखळकर म्हणतात की, समाजवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात संजय राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात.

दरम्यान, सध्या प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी असली तर डिजीटल माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष आपापला प्रचार पूर्ण ताकदीनं करत आहेत. २२ जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाने सर्व प्रचारसभा, रॅली यांच्यावर बंदी घातलेली असली तरी ऑनलाइन माध्यमातून प्रचार करण्याला परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाना पटोलेंचा पाय खोलात; भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल, अटकेची केली मागणी
पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर ३ वर्षे बलात्कार
मोदी इतकं खोटं बोलतात की टेलिप्रॉम्प्टरही झेलू शकलं नाही; परिषदेत गोंधळल्यामुळे राहूल गांधींनी लगावला टोला
”नाना पटोलेंची जीभ कापा अन् 1 लाखांचं बक्षीस मिळवा!”

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now