तसेच इथून पुढील निवडणूका दोन्ही पक्ष सोबत लढवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या युतीवर टीका केली.
तसेच यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘चंद्रशेखर बावनकुळे का तुमचा पोटशूळ उठला आहे? का संभाजी ब्रिगेडची एवढी भीती वाटते? झंडू बाम घेऊन ठेवा, कारण तुमची अजून झोप उडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना पुढे संतोष शिंदे यांनी म्हंटलं आहे की, आता झेंडा पण आमचा अन् दांडा पण आमचा आहे. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती दाखवू नका. भाजपाने संविधानविरोधी काम, लोकशाही संपवण्याचे काम सुरू केले आहे. हे नष्ट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आहे.’
दरम्यान, शिंदे पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले, असे भाजपा विचारत आहे. पहिल्याच निवडणुकीत बहुमताची अपेक्षा कशी काय करता? भाजपला महाराष्ट्रात सत्तेत यायला किती वर्षे लागली? असेही संतोष शिंदे म्हणाले आहेत.
लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे. तुम्हाला संभाजी ब्रिगेडची दहशत का वाटते? असा संतप्त सवालही शिंदे यांनी यावेळी केला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तोंडावर सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक