पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या खुनानंतर याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुसेवालाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली. तसेच मुसावालाच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले त्यानुसार संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. सौरभ महाकाळ याला मंचरवरून तर संतोष जाधव याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.यामधील संतोष जाधव याला २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी आता नवनाथ सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी दिली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, की संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती, असे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी सांगितले. त्याचबरोबर तेजस शिंदे हा संतोष जाधवचा मित्र आहे, त्याचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात लॉरेन्स बिष्णोई गँगचे काही ग्रुप असल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांमध्ये जी माहिती आली, त्याआधारे हा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. महाकालने जी माहिती दिली आहे. त्याची पडताळणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी राज्यस्थान, दिल्ली, गुजरात येथे या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले होते. दरम्यान, अटक आरोपींचे लॉरेन्स बिष्णोईसोबत संबंध कसे आले याचा तपास करण्यात येईल, मुसेवाला खून प्रकरणात यांचा सहभाग नेमका आहे का, हे ही तपासले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
..नाहीतर कारगिल युद्धातच मारले गेले असते परवेज मुशर्रफ, ‘या’ एका कारणामुळे नशीबाने दिली साथ
कपडे घालायचा कंटाळा यायचा म्हणून अभिनेत्रीने संपूर्ण शरीर फुलं आणि पानांनी झाकले; पहा फोटो…
बिग ब्रेकींग! निवडणूक आयोग संजय राऊत यांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी
राखीवर कायदेशीर कारवाई करण्याची रितेशची धमकी; म्हणाला मी बेशरमवर करोडो रूपये उधळले