Share

Shinde group : कुटुंबासोबत होतो म्हणून, नाहीतर दाखवलं असतं शिंदे साहेबांचा पठ्ठा कसा असतो, माझं चॅलेंज आहे की…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर आज अमरावती येथे शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते, यावेळी त्यांच्यावर हा हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला.

माहितीनुसार, संतोष बांगर आज दुपारी ३वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली. त्यांनंतर शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले.

सहा वाजेच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होतंय हे समजलं नाही.

या घटनेने लाला चौकात एकाच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बांगर यांनी लोकमत ला प्रतिक्रिया दिली की, गुरुजींचे दर्शन घेण्यासाठी मी कुटुंबियांसोबत गेलो होतो. मठाबाहेर आल्यानंतर चार -पाच तरुण गाडीजवळ आले. घोषणाबाजी करत होते. गाडीच्या मागे पळत होते.

तसेच म्हणाले, मी कुटुंबियांसोबत असल्याने मी गाडीखाली उतरलो नाही. नाहीतर, हल्लेखोरांना बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा पट्ट्या कसा असतो हे दाखवलं असतं. त्यांना खेदून -खेदून मारलं असत, असे बांगर म्हणाले.

तसेच म्हणाले, कुटुंबियांनी गाडीखाली उतरू दिलं नाही, नाहीतर हल्ला झाल्यावर एक घाव दोन तुकडे केले असते. त्यांच्यात एवढी धमक आहे तर आव्हान देतो की, मी त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो, ज्यांच्यात धमक आहे त्यांनी यावं असे संतोष बांगर म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now