santosh bangar : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असलेले बांगर हे अचानक काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले. बांगर हे शिंदे गटात सामील होताच ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. तेव्हापासून बांगर हे चांगलेच चर्चेत आहेत.
अशातच आता त्यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले असल्याच बोलले जातं आहे. गुरुवारी बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ केली असल्याच वृत्त आता समोर आल आहे. यामुळे आता बांगर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याच चिन्ह पाहायला मिळत आहे.
मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल असल्याच बोललं जातं आहे.
वाचा सविस्तर नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १५ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने बांगर यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली.
पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. मात्र असं असलं तरी देखील यावर बांगर यांनी असे काही घडलेच नसल्याचे म्हटले आहे. सीसीटीव्ही चेक करुन सत्य शोधू शकता, अशी भूमिका संतोष बांगर बोलून दाखवली आहे.
पुढे बोलताना बांगर यांनी म्हंटलं आहे की, ”मी पोलिसांसोबत हुज्जत घातलेली नाही. पोलिस बांधव हे आपल्यासाठीच ड्युटीवर असतात. आमदारांसोबत पाच-दहा कार्यकर्ते असतात. पोलिस त्यांना आत सोडतात. त्यामुळे मंत्रालयाच्या गेटवर कुठलाही वाद होण्याचा प्रश्नच नाही.” असं बांगर यांनी म्हंटलंय.
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज