ख्रिसमस आता जवळ आला आहे. त्यामुळे सगळे जण हा सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहे. अशात गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांता क्लॉज बनलेल्या एका तरुणाला लोकांनी जबर मारहाण केली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे.
गुजरातच्या बडोद्यामध्ये एक व्यक्ती सांता क्लॉजचा पोशाख परिधान करुन गिफ्ट वाटत होता. अशात मकरापुरातील रहिवाशी वसाहतीत त्याला जमावाने मारहाण केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु आहे.
शशीकांत डाभी असे त्या व्यक्तीचे नाव आहे. शशीकांत हा सांता क्लॉजच्या वेशात गिफ्ट वाटत होता. शशीकांत हा मकरापूर परिसरातील एका सोसायटीमध्ये लोकांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचला होता. त्यावेळी काही ख्रिश्चन समाजाचे नेते देखील त्यावेळी होते.
अशात ते ख्रिश्चन घरात जाऊन गिफ्ट देत होते. अशात काही जणांचा एक गट अचानक ख्रिश्चन कुटुंबात घुसला. त्यांनी तो कार्यक्रम रोखला आणि अचानक सांता क्लॉजवर हल्ला केला. जमावाने त्यांना पोशाख काढायला लावला. तसेच इतर लोकांनाही त्यांनी धमकावलं.
या परिसरात अशाप्रकारचे कार्यक्रम होऊ देणार नाही. हा परिसर हिंदुंचा आहे. त्यामुळे इथून चालते व्हा. इथे ख्रिसमस साजरा करु दिला जाणार नाही, असे म्हणत त्या जवामावे सांता क्लॉजवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह चार जण जखमी झाले आहे.
हल्ला करणाऱ्यांनी फादरचे कपडे फाडल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी मकरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याचा तसाप सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सांताचा पोशाख घालून वसाहतीत चॉकलेट वाटत होता आणि लोकांना ख्रिसमतच्या शुभेच्छा देत होता.
अशात काही लोकांनी सांताच्या चॉकलेट वाटण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये वाद झाला. यामध्ये ख्रिश्चन समाजाली लोक जखमी झाल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच आपल्याला सुरक्षा पुरवा अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
jaykumar gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; कार थेट ३० फुट खोली दरीत कोसळली, आमदारांसह ४ जण…
aditya thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले, त्यादिवशी मी…
kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत