मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. याद्वारे ती अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असते. नुकतीच संस्कृतीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे संस्कृतीने तिला ‘८ दोन ७५ – फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटासाठी वेगवेगळे ४ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली आहे. संस्कृतीच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
संस्कृतीने इन्स्टाग्राम हँडलवर तिला मिळालेल्या पुरस्कारांसोबतचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिले की, ‘खोटं तर बोलणार नाही. पण तरीही हे सर्व पचविण्याच्या प्रक्रियेत आहे. ‘८ दोन ७५ – फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट प्रेम, फॅशन आणि अथक परिश्रमाने तयार करण्यात आलेला चित्रपट आहे. चित्रपटाला मिळालेले पुरस्कारच याचा पुरावा आहेत’.
संस्कृतीने पुढे लिहिले की, ‘जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून चित्रपटाला एकूण ६५ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय वैयक्तिक पुरस्कार जिंकणे, हे अधिक बळ देते. केवळ एक अद्भुत टीमच अशी घटना घडवू शकते. या गोष्टीने मी खूपच भारावून गेले आहे. यासाठी आमच्या निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे आणि चित्रपटातील सर्व कलाकरांचे मनःपूर्वक आभार’.
पुढे संस्कृतीने तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादी दिली आहे. यामध्ये तिला ‘इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’, ‘ड्रूक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ आणि ‘गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ अशा तिन्ही चित्रपट महोत्सवांमध्ये ‘८ दोन ७५ – फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला आहे.
सुश्रुत बागवत दिग्दर्शित ‘८ दोन ७५ – फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाला देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ६५ पुरस्कार मिळाले आहेत. संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तर शुभंकरलाही या चित्रपटासाठी ४ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. संस्कृती आणि शुभंकरशिवाय या चित्रपटात आनंद इंगळे, शर्वानी पिल्लाई, विजय पटवर्धन, संजय मोने, पुष्कर श्रोत्री यासारखे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, संस्कृतीने ‘पिंजरा’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिची पहिलीच मालिका चांगली गाजली व ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. मालिकेत काम करत असतानाच तिला ‘सांगते ऐका’ चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘निवडूंग’, ‘एफयू’, ‘टेक केअर गुड नाईट’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची कसब दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या :
‘दोन पिच्चरमध्ये मराठी सिनेमाला कुठल्या कुठं नेलंस तू भावा’, किरण मानेंनी केले तोंडभरून कौतुक
PHOTO: ऐश्वर्याची बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; ५०० कोटी बजेट असलेल्या ‘या’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज
VIDEO: झुंड पाहिल्यानंतर धनुषही झाला भावूक, म्हणाला, ‘चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकून घेतलं’