मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याला चाहत्यांपासून ते सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीपर्यंत सर्वजण शुभेच्छा देत आहे. यादरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयसच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही खास पोस्ट शेअर करत श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या (sankarshan karhade wishes shreaysh talpade) आहेत.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर श्रेयससोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते दोघे वेगवेगळे पोझ देताना दिसून येत आहेत. तसेच मागे तेरी जीत मेरी जीत हे गाणं वाजत आहे. व्हिडिओ शेअर करत श्रेयसने लिहिले की, ‘.. तू खरंच खूप चांगला आहेस. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे. आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस’.
त्याने पुढे लिहिले की, ‘आजवर एक अनुभवी, यशस्वी अभिनेता म्हणुन तू माझ्यावर कधीही, एकदाही, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीस. तू तुझ्या असण्याचं, वलयाचं माझ्यावर कधीही दडपण आणलं नाहीस. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येऊन सांगितलंस. तुझं मन खरंच खूप मोठं आहे’.
‘स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात. तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करतांना ऐकलं नाही. म्हणूनच माझ्या आयुष्यात आजवर जे जे जेष्ठ किंवा अनुभवी कलाकार आले, ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील’.
‘शिवाय समीर म्हणुन मी काम केल्याने माझ्या लोकप्रियतेत, लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमात जी भर पडलीये आणि त्यामुळे मला जे जे काही म्हणुन मिळतंय त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद. दादा तुला शुभेच्छा अशा देतो की, तुला हवं ते सगळं मिळु दे. तुझ्या इथून पुढच्या सगळ्या कलाकृतींना घवघवीत यश मिळु दे. तुझ्या कलाकृतींना भाषेचं बंधन न राहाता तु सगळ्या जगांत लोकप्रियता मिळव’.
‘एक नवरा म्हणून सुख, बाप म्हणून अभिमान, कलाकार म्हणून यश आणि माणूस म्हणून समाधान तुला आयुष्यभर मिळत राहावं हीच देवाला प्रार्थना’, अशा शब्दात संकर्षणने श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संकर्षणच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच मैत्रीची जोडी असावी तर संकर्षण आणि श्रेयससारखी असावी, असे कमेंटद्वारे सांगत आहेत.
दरम्यान, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत श्रेयस यश ही भूमिका तर संकर्षण समीर ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्या दोघांमधील बॉन्डिंग आणि त्यांची मैत्री पाहून प्रेक्षक त्यांचे भरभरून कौतुक करत असतात. ऑनस्क्रिनप्रमाणे ऑफस्क्रिनमध्येही त्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे. दोघेही नेहमी सेटवर एकमेकांसोबत मजामस्ती करताना दिसून येतात. तसेच यादरम्यानचे फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची शेअर करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या :
‘देव माझ्या ब्रा ची साईज घेत आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने देशात खळबळ, पहा व्हिडीओ
प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…
‘मी केवळ पार्टीसाठी आणि पैसै उधळण्यासाठी लग्न केले’, अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा