Share

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेच्या भावाची वर्णी; दिसणार ‘या’ भूमिकेत

sankarshan karhade brother

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत समीर ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मालिकेतील आपल्या भूमिकेद्वारे संकर्षण प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. तसेच ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांद्वारे तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दुसरीकडे संकर्षणचा भाऊ (sankarshan karhade brother )अधोक्षजसुद्धा लवकरच एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकर्षणचा भाऊ अधोक्षजसुद्धा अभिनेता आहे. त्याने झी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तो झी वाहिनीवरीलच ‘घेतला वसा टाकू नको’, या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर आता तो एका नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

अधोक्षजने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या आगामी मालिकेतील भूमिकेचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जसा पेहराव, भूमिकापण अगदी तशीच! एकदम कलरफुल्ल, ‘बंटी’. नवीन मालिका, नवीन भूमिका, नवं आव्हान! ‘पिंकीचा विजय असो!’ ३१ जानेवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता, स्टार प्रवाहवर’.

अधोक्षजच्या या पोस्टद्वारे लक्षात येत आहे की, ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत तो बंटीची भूमिका साकारत आहे. तर या मालिकेत अभिनेता विजय आंदळकर युवराज धोंडे पाटीलच्या भूमिकेत आणि अभिनेत्री शरयू सोनवणे पिंकीच्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज आणि पिंकीची हटके लव्हस्टोरी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

विजय आंदळकर आणि शरयू सोनवणेशिवाय या मालिकेत अमिता खोपकर, पियुष रानडे, अंकिता जोशी, मुकेश जाधव, सुनील तावडे हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ३१ जानेवारीपासून हा शो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: शुटींगनंतर कतरिना घेत आहे विक्की कौशलची काळजी, बेडरुममधील फोटो झाला व्हायरल
सारा-विक्कीच्या चित्रपटाच्या शुटींगमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, घडले असे काही की..
सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी माधुरी खाते ‘हे’ खास प्रकारचे सॅलड, वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now