Narendra Modi : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असल्याची बातमी समोर आली होती. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आप’च्या नेत्याने पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे.
शुक्रवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिर याठिकाणी ‘आप’चे नेते व खासदार संजय सिंह यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानी यांना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे, तर आम्हाला भारताला जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनवायचा आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
भाजप आणि आमच्या आर्थिक प्राधान्यात हाच प्रमुख फरक असल्याचेही ते म्हणाले. तसेच मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी झालेले सरकार आहे, अशा शब्दात संजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
पुढे बोलताना संजय सिंह म्हणाले की, मोदी सरकारने सत्तेवर येण्याआधी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मागील ७ वर्षांमध्ये देशात फक्त ७ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. ही संसदेत दिलेली त्यांचीच अधिकृत संख्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच कित्येक कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून फरार झालेल्या उद्योगपतींचे कर्ज सरकारकडून माफ करण्यात आले आहे. आता जनतेवर विविध कर लावून या कर्जाची वसुली जनतेकडून करण्यात येत आहे. मोदी सरकारने खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक पदार्थांवरदेखील कर लावला आहे, असे संजय सिंह यावेळी म्हणाले.
या सभेकरिता प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, महाराष्ट्र संघटक विजय कुंभार, महादेव नाईक, अभिजित मोरे, प्रीती मेनन इत्यादी मंडळी उपस्थित होती. तसेच आदर्श सरपंच भास्करराव पेरे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, परंतु आपचे धोरण आणि कामकाज पटत असल्यामुळे त्यांच्या व्यासपीठावर उपस्थित असल्याचे भास्करराव पेरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Narendra Modi: सगळा देश मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय पण चर्चा मात्र शिंदेंच्या शुभेच्छांचीच; कारण…
dhananjay munde : ‘भाजपकडे १२० आमदार असूनही…,’ धनंजय मुंडेंनी शेलक्या शब्दात फडणवीसांना झापलं
Chandrakant Khaire : “आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता “
Nagpur Medical: आई बापानं सलग २४ तास अंबू बॅगनं कृत्रिम श्वास दिला; शेवटी मुलीचा व्हेंटिलेटरअभावी तडफडून मृत्यू