Sanjay Shirsat : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना निमंत्रण दिले आहे. मात्र, या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाकरिता भाजप आणि शिंदे गटातील सर्व आमदार हजेरी लावणार आहेत. परंतु, संजय शिरसाट या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता परत मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ते जात नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे मला स्नेहभोजनाला उपस्थित राहता येणार नाही. याबाबतची पूर्वकल्पना आधीच मुख्यमंत्र्यांना देत त्यांची परवानगी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे मी नाराज वगैरे काही नाही. केवळ मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी ‘वर्षा’वर जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची सगळी माहिती आपण घेतली आहे. या कार्यक्रमाला आपण अनुपस्थित राहणे ही काही मोठी गोष्ट नाही, असेही ते म्हणाले. परंतु, यामुळे जर मी नाराज आहे अशा बातम्या पसरत असतील तर मला स्नेहभोजनाला जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीच चर्चा नाही. मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Supreme Court : शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सर्वोच न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
BJP : शरद पवारांना रोखण्यासाठी भाजप आक्रमक, बारामतीत राबवणार अमेठी पॅटर्न; ‘हा’ आहे गेम प्लॅन?
Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ






