sanjay shirsat return in thackeray group | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात दोन गट पडले आहे. एक एकनाथ शिंदे गट आहे, तर दुसरा उद्धव ठाकरे गट आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहे. तर अपक्ष १० आमदार आहे. पण त्यांच्यापैकी काही आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले काही आमदार नाराज असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचे नाव सातत्याने चर्चंत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी मीडियासमोरही आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली होती.
अशात संजय शिरसाट हे पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याचा विचार करत आहे, अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाल्या आहे की, संजय शिरसाट हे अस्वस्थ असून ते लवकरच ठाकरे गटात परत येणार आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय शिरसाट हे प्रचंड अस्वस्थ आहे. त्यांची मंत्रिमंडळात निवड झालेली नाही. त्यामुळे ते खुप नाराज झालेले आहे. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिपद दिल्यामुळे संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
पुढे ते म्हणाल्या की, शिंदे गटाकडून काही कार्यकारिणीपदे जाहीर झाली आहे. पण त्यामध्येही संजय शिरसाट यांची निवड झालेली नाही. सतत आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते खुपच अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातून ठाकरे गटात येणारे ते पहिले आमदार असतील.
दरम्यान, जळगावमध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. त्या यात्रेमध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर चांगल्याच आक्रमक झाल्याच्या दिसत आहे. त्यांनी भाषणा दरम्यान बंडखोर नेत्यांना चांगलंच सुनावलं होतं. तसेच त्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
Pakistan : ‘वर्ल्कपमध्ये बड्या बड्या संघांना जे जमलं नाही, तो पराक्रम पाकिस्तानी संघाने करुन दाखवला’
Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज






