मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाचा भडका उडाला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकही यावरून आमनेसामने आले आहेत. दररोज या मुद्द्यावरून आरोप प्रत्योरोप होत आहेत. संजय राऊतांनी तर भाजप शिंदे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
तुमच्यात हिंमत असेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर महाराष्ट्रात खटला दाखल करून दाखवा, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजप शिंदे सरकारला दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांचे आदेश धुडकावून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सीमावाद पेटवत आहेत.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार शेपटी घालून बसतय, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजप बोम्मईंनाच काय दाऊद इब्राहिमलाही क्लीन चीट देईल, असंही संजय राऊत म्हणाले. “दाऊद इब्राहिमने भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याला क्लीन चिट मिळेल” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की माझ्यावर आणि जयंत पाटील यांच्यावर ते खटले दाखल करू इच्छितात. माझं सरकारला आव्हान आहे. तुम्ही जर मराठी मातीचे इमानदार पाईक असालं, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईवरती खटला दाखल करा. त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहेत.
आमची इच्छा सर्वकाही करण्याची आहे. पण, सरकारमध्ये हिंमत आहे का. आमची भाषा घुसण्याची आहे. ती भाषा आम्ही केली आहे. तुम्ही याची एसआयटी लावता. त्याची एसआयटी लावता. त्याची चौकशी करता. त्याला क्लीनचीट देतात. उद्या तुम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनाही क्लीनचीट द्याल.
राज्य सरकारनं क्लीनचीटचा कारखाना उघडला आहे. कुणा-कुणाला मिळाली मला माहीत नाही. उद्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही क्लीनचीट मिळेल. उद्या पाकिस्तानात राहून दाऊत इब्राहीम यांनी भाजपात प्रवेश केला, तर त्यांनाही क्लीनचीट मिळेल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
या सरकारला शेपट्या फुटल्या आहेत. रोज एक शेपटी आतमध्ये घालतात. २० लाख मराठी बांधव अन्यायग्रस्त आहेत. निदान त्यांच्या बाबतीत तरी महाराष्ट्राशी इमान राखा, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी तर भाजप शिंदे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
त्याने माझे ब्रेस्ट दाबले, पँटमध्ये हात टाकला अन्…; मराठी अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप
लाइव्ह मॅचमध्ये संतप्त भारतीय फलंदाजाने केले ‘असे’ कृत्य, BCCI करू शकते मोठी कारवाई, करिअरला धोका
ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरवा पोशाखच का घालतात? जाणून घ्या खरे कारण…