Share

मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता? संजय राऊतांचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल

sanjay raut

राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. शिवसेना नेते आणि त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे दिसत आहे.

केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यातच, केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरुन शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहेत.

तसेच ठाकरे सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. तसेच जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

प्राप्तिकर विभागाला जाधव यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

डायरीतील नोंदीवरूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते. त्यावर, संजय राऊत यांनी जैन डायरीचा उल्लेख करत उत्तरही दिलं. राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापणेत संजय राऊत यांनी मुख्य भूमिका बजावली होती. राज्यात सत्तांतर झाल्यापासून राऊत हे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या राऊत यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1508662046006853632?s=20&t=LNicrXwdlnl-1TI1aoAJAQ

दरम्यान, कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत राऊत यांनी यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज विरोधकांवर तुटून पडणारे राऊत अचानक का शांत झाले? हा प्रश्न सध्या उपस्थित होतं आहे. यावर ट्विटवर आता राऊत काय प्रतिक्रिया देताहेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार येणार गोत्यात? जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी आली अंगाशी; नेत्यांवर गुन्हा दाखल
मुलीला छेडल्यामुळे बापाने दिली ‘ही’ शिक्षा; वाचून पायाखालची जमीन सरकेल
सरकारचा मोठा निर्णय! आता घरोघरी पोहोचणार रेशन, मिळणार ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’
यशवंत जाधवांनी आईवरच फाडलं बिल? ‘मातोश्री’ला दोन कोटींचे गिफ्ट देण्याबाबत डायरीतून झाला मोठा खुलासा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now