Share

shivsena : मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरूंगातच, न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढला

sanjay raut ..

shivsena : फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत सध्या मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सध्या सुरू असून या चौकशी दरम्यान संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार असल्याची महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे.

संजय राऊत यांना ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये संजय राऊत असणार आहेत.

संजय राऊत यांनी जामीनासाठी देखील अर्ज केला होता. मात्र १० ऑक्टोबरपर्यंत ते न्यायालयीन कोठडीतच असणार असल्याचे सध्या समोर आलेल्या माहितीतून स्पष्ट होते. पत्राचाळ येथील रहिवाशांसाठी म्हाडा घरकुल योजनतून त्यांना सदनिका देणार होते. त्यासाठी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला सदनिका बांधण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले होते.

मात्र या कंपनीचे मालक प्रवीण राऊत यांनी यात मोठा आर्थिक घोटाळा केला. प्रकल्पातील शेअर्स परस्पर खाजगी विकसकांना विकण्यात आले. ईडीकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यावर प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून मोठी रक्कम पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे ही रक्कम का पाठवण्यात आली? तसेच त्यांचे कोणते संबंध होते? कशा प्रकारचा व्यवहार यातून झाला होता? या सगळ्या गोष्टींची चौकशी ईडीकडून सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याकडेच संशयाची सुई जात असून ईडीला त्याबाबत काही कागदपत्रे राऊत यांच्या घरातून सापडल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणी १० ऑक्टोबरपर्यंत संजय राऊत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत. हे मात्र सध्या स्पष्ट होते.

आत्ताच्या घडीला संजय राऊत अर्थररोड जेलमध्ये आहेत. त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम अधिकच लांबणार असल्याचे यावरून दिसते. त्यामुळे संजय राऊत दसरा मेळाव्याला उपस्थित नसणार हे तर उघड आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्यावतीने विरोधकांवर तोफ डागणारे संजय राऊत यांची अनुपस्थिती शिवसैनिकांना जाणवेल हे मात्र खरे.

महत्वाच्या बातम्या-
Anil Deshmukh : जामीन मंजून होऊनही अनिल देशमुखांची तुरूंगातून सुटका नाहीच; कारण आले समोर
MNS : ”माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही”
Ravi Rana : ”एकनाथ शिंंदेंच्या दसरा मेळाव्यात उरलेली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करेल”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now