सध्या राजकिय वर्तुळात केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे हात धुवून लागली आहे. नुकतीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपती जप्त केली आहे. या कारवाईनंतर आज संजय राऊत दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. यावेळी संजय राऊतांचे शिवसेना जंगी स्वागत करणार आहे.
विशेष म्हणजे, राऊतांच्या स्वागतासाठी शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. संजय राऊत यांचे स्वागत मुंबई विमानतळापासून ते त्यांच्या भांडुपमधल्या घरापर्यंत केले जाणार आहे. यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने राऊतांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केली.
त्यामुळे शिवसेना नेते केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या कारवाईवर आक्षेप नोंदविला आहे. ईडीने केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान आपल्यावर झालेल्या कारवाईनंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती.
यावेळी त्यांनी, ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती. ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती असल्याचे म्हणले होते.
तसेच पुढे बोलताना, “या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते, आता होत आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही. इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही.” असे संजय राऊतांनी म्हटले होते.
त्यानंतर बुधवारी संजय राऊतांनी थेट भाजप नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी जमा करत ते पैसे निवडणुकीसाठी तसंच मुलाच्या कंन्स्ट्रक्शन कंपनीत वापरले असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्यांनी किरीट्ट सोमय्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मी खोटा असतो तर एवढा खवून आन् उचकून लढलो नसतो भावानों’, किरण मानेंची आणखी एक पोस्ट चर्चेत
भावनिक! जिथं आई 25 वर्षे सफाई कामगार म्हणून करत होती काम, तिथंच आमदाराचे प्रमुख पाहुणे म्हणून आगमन
भारताविरुद्ध ३ वर्ष विष ओकत राहिले इम्रान खान, पंतप्रधान मोदींनी अशी पलटली बाजी, आता आले शहाणपण
पाकिस्तानमध्ये पडलेल्या मिसाईलवर फिलीपींन्सने भारताला विचारला जाब, जाणून घ्या यामागचे कारण