Share

‘हे बोगस, भंपक, आणि लफंगे आहेत’ संजय राऊतांची राज ठाकरेंवर असभ्य शब्दांत टीका

महाराष्ट्र राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद -प्रतिवाद वाढतच चालला आहे. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे यावरून या वादाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत असभ्य शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरे यांना चोर, लफंगे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. तसेच म्हणाले, हिंदुत्ववासाठी सर्वांत जास्त त्याग हा शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेच्या प्रमुख प्रवक्त्यांची बैठक झाली, त्यावेळी संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज ठाकरे आणि त्यासोबतच भाजपवर नाव न घेता सडकून टीका केली. म्हणाले, ‘यांची लायकीच नाही हिंदुत्वावर बोलण्याची. हे सगळे बोगस, भंपक, आणि लफंगे आहेत.’ असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

तसेच म्हणाले, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना जसे मुस्लिम मत कापण्यासाठी भाजपकडून मैदानात उतरवलं जातं, तसे भाजपकडून काही हिंदू ओवेसी शिवसेनेच्या विरुद्ध वापरण्याचं कट कारस्थान करण्याचं षडयंत्र आहे. हे त्यांच्यावरच उलटेल. असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

म्हणाले, हिंदू ओवेसी नेमका कोण आहे हे देश जाणतो. जसा असदुद्दीन ओवेसी यांना देश जाणतो. त्यांना मुस्लिम समाज जसा आता ओळखू लागला आहे, तसा आता हिंदू ओवेसींनाही हिंदू समाज हळूहळू ओळखायला लागला आहे. अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

यावेळी हिंदुत्वाबद्दल आपले मत मांडताना संजय राऊत म्हणाले, विरोधक म्हणजे नक्की कोण? त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? हिंदुत्वासाठी सर्वाधिक त्याग शिवसेनेने केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्वासाठी 6 वर्षे मतदानाचा हक्क हिरावला गेला होता. इतका मोठा त्याग या देशात हिंदुत्वासाठी कोणीच केला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now