Share

‘संजय राऊत समोर आले तर चपलेचा प्रसाद देईल’; ८५ वर्षीय आजी एवढ्या का भडकल्या

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांच्या मुंबईतील घरी ईडीने रविवारी छापा टाकला. त्यानंतर त्यांची कसून चौकशी झाल्यावर ईडीने त्यांना रात्री उशिरा अटक केली. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ताब्यात घेतलं आहे. याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

त्यातच, पत्राचाळ प्रकल्पग्रस्त ८५ वर्षीय एका आजीने संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. या आजीने राऊतांचं आम्ही काय बिघडवलं होतं? आज जर ते माझ्यासमोर आले तर मी चपलेचा प्रसाद देईल, असं म्हणत संजय राऊत यांच्यावर संताप व्यक्त केला.

या ८५ वर्षीय आजीचे नाव शांताबाई मारुती सोनवणे आहे. जेव्हा वयाच्या १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या लग्न होऊन पत्राचाळीत राहायला आल्या. आज त्यांचं वय ८५ वर्ष आहे. त्यांनी पत्राचाळ पुनर्विकास रखडल्यामुळे रहिवाशा़ंना वनवास भोगावा लागतोय अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शांताबाई मारुती सोनवणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पत्राचाळीत जेव्हा राहायला आले तेव्हा इथं २० रुपये भाडं होतं पण आज इथले दर गगनाला भिडले आहेत. घर खाली केल्यानंतर बिल्डरने काही वर्ष आम्हाला भाडं देखील दिलं.

परंतु, त्यानंतर बिल्डरने हात वर केले. आम्ही संजय राऊतांचं काय बिघडवलं होतं? त्यांच्या घोटाळ्यामुळे आज आम्हाला भोगावं लागत आहे असं या ८५ वर्षीय आजी म्हणाल्या. आता आम्हाला पुनर्विकास होईल आणि आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ याची कोणतीही आशा नाही, असंही शांताबाई म्हणाल्या.

तसेच म्हणाल्या, पत्रा चाळ सोडल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत. घराचं भाडं २० हजार रुपये आहे. भाडं देण्यास उशीर झाला तर मालक आम्हाला घर सोडून जावा असं म्हणतो. मग आम्ही आमचा संसार कसा चालवायचा?आमच्या घरात कुणी कमवता नाही, असे आजीने संताप व्यक्त करत सांगितले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now