सध्या वेगवेगळ्या मुद्यावर राजकारण तापलेले आहे. अशात महाविकास आघाडी नेते आणि भाजप नेते एकमेंकावर आरोप करताना दिसून येत आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट मोदींवरच निशाणा साधला आहे. मोदी हे हिटरलला फॉलो करतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. (sanjay raut warning bjp)
युवासेनेच्या मेळाव्यात संजय राऊत उपस्थित होते. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हिटलर हा लोकप्रिय नेता होता. नंतर तो पराभूत झाला. बाळासाहेब ठाकरेंनाही हिटलर प्रिय होता. सध्याचे पंतप्रधानही हिटलरच्या प्रेमात आहे. त्यामुळे हिटलरचं कोणी कौतूक करत असेल तर त्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
हिटलरने प्रचाराचे महत्व सांगितले आहे. हिटलर गोबेल्सच्या माध्यमातून इव्हेंट्स फार करायचा. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेंट हिटलर करत असे. तसेच इव्हेंट मोदी आणि त्यांचा पक्ष करतोय असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच जेव्हा जगात हिटलरची बदनामी सुरु होती तेव्हा १९३५ चं ऑलम्पिक हिटलरनं जर्मनीत भरवलं आणि जगाला दाखवून दिलं की हिटलर किती महान आहे. आज वेगळं काय घडतंय. आपल्याला देखील याच मार्गाने पुढे जावे लागेल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
हिटलर आणि मोदींच्या प्रचारात बरंच साम्य आहे. विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला ती हिटलरची रणनिती आहे. त्यामुळे आता जर राज्य टिकवायचे असेल आणि त्या प्रवृत्तीविरोधात लढायचे असेल तर समोरच्यांप्रमाणे आपल्या लोकांना तयार करावे लागेल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
राहूल गांधींना २०१४ साली बदनाम करण्याचं काम भाजपनं केलं. सोशल मीडियावर त्यांना बदनाम करण्यात आलं, भाजपच्या आयटी सेलचं सगळ्यात जास्त बजेट राहूल गांधींना बदनाम करण्यासाठीच खर्च झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच युद्धात सगळं काही क्षम्य असतं, पण प्रेमात नैतिकता पाळली पाहिजे. जेव्हा अंगावर येत असेल तेव्हा तुम्ही नैतिकता पाळणार नसाल. तुम्ही पाठीमागून वार करणार असाल, तर मलाही कोथळा तुमचा कोथळा बाहेर काढण्याचा अधिकार आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात खरी मदर इंडिया! लहान वयात झाली विधवा, शेती करून ४ मुलांना बनवले अधिकारी
ख्रिस गेलसोबत IPL मध्ये झालाय अन्याय, म्हणाला, मला वाईट वागणूक मिळाली म्हणून…
ताजमहालाचे रहस्य उलगणार! वर्षानुवर्षे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यासाठी हायकोर्टात याचिका