राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. लवकरच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ मे ला संपला.
त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती कोणत्या नवीन पक्षात जाणार की नवीन पक्ष स्थापन करणार का? असा प्रश्न जनतेला पडला होता. अशातच राज्यसभा निवडणुकीच्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे.
तर संभाजी राजे यांना राष्ट्रवादीने पाठींबा जाहीर केला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंबंधी माहिती दिली. ‘राष्ट्रवादी पुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अरिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवारांनी सांगितले आहे.
त्यातच आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी ‘शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा,’ असं म्हंटलं आहे. सध्या राऊतयांच्या ट्विटने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल, असं त्यांनी ट्विटमधून स्पष्ट केलं आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
यासोबतच ‘कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे,’ असं सूचक ट्विट करत संजय राऊत यांनी केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने संभाजीराजेंना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ऑफर दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेची सहावी जागा त्यांना दिली जाईल, अशी अंतर्गत चर्चा शिवसेनेत सुरू आहे. दरम्यान, राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
एमएस धोनीच्या शुटींगदरम्यान सुशांतकडे एक बुकलेट होती ज्यामध्ये.., कियाराने सांगितला किस्सा
‘यापुढे महिलेवर हात उचलला तर हात तोडून हातात देईन’, पुण्यातील राड्यावरून सुप्रिया सुळे भडकल्या
सरकारने ताजमहाल आणि कुतूबमिनार लवकरात लवकर हिंदूंच्या ताब्यात द्यावे; चक्क काॅंग्रेस नेत्याची मागणी
…म्हणून भारतातील हॉटेलमध्ये १३ नंबरची रुम नसते; कारण वाचून बसेल धक्का