Share

किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, राऊत उघड करणार ‘ते’ घोटाळा प्रकरण, ट्विट करत म्हणाले..

Kirit-Sommiya-Sanjay-Raut.j

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणामुळे भाजपा नेते किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परंतु त्यांच्या अडचणीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणखीन वाढ करणार असल्याचे दिसत आहेत. कारण की, लवकरच संजय राऊत सोमय्या कुटुंबाचे टॉयलेट घोटाळा प्रकरण बाहेर काढणार आहेत. या टॉयलेट व्यवहारात सोमय्या कुटुंबाने १०० कोटींहून अधिक गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी लावला आहे.

संजय राऊत यांनी शुक्रवारी एक ट्विट करत, किरीट सोमय्या अँड फॅमिलीचा टॉयलेट घोटाळा… आयएनएस विक्रांत फाईलनंतर येत आहे.. टॉयलेट एक लव्ह स्टोरी.. असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. आपल्या ट्विटमध्ये राऊतांनी लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचे म्हटले आहे.

https://www.facebook.com/113449342685590/posts/948628599167656/?d=n

त्याचबरोबर, या घोटाळ्यात १०० कोटीहून अधिक अपहार झाल्याचा आरोप त्यांनी सोमय्या कुटुंबावर लावला आहे. इतकेच नव्हे तर, आज पार पडलेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी पुन्हा या घोटाळ्याचा बोलताना उल्लेख केला आहे. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, “आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत..” तसेच, “हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते. यांचं कुटुंबाने संस्थेत शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे,” असा आरोप राऊत यांनी सोमय्यांवर केला आहे.

पुढे बोलताना, “या घोटाळ्याचे कागद पाहून मला हसायला आलं. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरं म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार कणव आहे.

राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते भाजपाच्या लोकांची. कालपण मी पाहिलं शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केलेत. एखादं ट्विट त्यांनी आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवं. एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावर करावं जो आम्ही काढणार आहोत,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. राजकिय वर्तुळातही राऊतांच्या आरोपांमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच संजय राऊत टॉयलेट घोटाळा प्रकरण उघडकीस आणून देणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
आलियापेक्षा वरचढ निघाल्या सासू ननंद, लग्नातील लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पहा फोटो
यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरली, तरीही कोर्ट आमच्यासाठी; भाजप आमदाराचे हैराण करणारे वक्तव्य
पुण्यात ‘या’ ठिकाणी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पहिले हनुमान चालीसा पठण, ‘हिंदुजननायक’ म्हणून ठाकरेंचा उल्लेख
ब्रेकिंग! उदयनराजेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, सदावर्तेंचा मुक्काम पोलिस कोठडीतच

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now