महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय सत्तासंघर्षानंतर अनेकांनी शिवसेनेसारख्या हिंदुत्वाची विचारसरणी बाळगणाऱ्या पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांची केलेली आघाडी अयोग्यच असल्याचे म्हंटले होते. शिवसेना पक्षातील बंडखोर आमदारांचा हाच मुख्य आक्षेप होता. आता प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात एक मोठा दावा केला आहे.(Sanjay Raut tied Shiv Sena to the sway of NCP and..)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या दावणीला बांधली, त्यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आला. असा दावा विधानपरिषद विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकरांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणेच शिवसेना पक्षातून बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी राष्ट्रवादीचा माविआ सरकारमध्ये वरचष्मा होता. त्यामुळे शिवसेनेला नावाचेच मुख्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली, अशी टीका अनेक आमदारांनी महाराष्ट्राबाहेर बंडखोरी करून गेल्यावर केली होती.
अजित पवार निधी देत नाहीत. तसेच अधिकाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जातो. सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादी पक्षाकडे आहेत, त्यामुळे सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला फार काही आले नाही, अशा प्रकारचा आरोप शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता.
अनेकांनी शिवसेनेत घडलेल्या एवढ्या मोठ्या बंडाला राष्ट्रवादीचा जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. काहींनी संजय राऊत राष्ट्रवादी पक्षाशी जवळीक साधून शिवसेना पक्षाचे खूप नुकसान करत आहेत, अशी टीका त्यांच्यावर केल्याचे समजते.
प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांविषयी होणारा दबक्या आवाजातला आरोप थेटपणे बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया व्यक्त करतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेचा ढाण्या वाघ राबतोय शेतात, अधिवेशनानंतर भास्कर जाधवांचा शेती करतानाचा फोटो व्हायरल
इंग्लंड मालिकेत फ्लॉप कामगिरी केल्यामुळे ‘या’ स्टार खेळाडूंची कारकीर्द संपण्याच्या उंबरठ्यावर
‘उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर…’; एकनाथ शिंदेंनी केले मोठे विधान