Share

मनसेचं आंदोलन कुठं दिसलंच नाही, त्यामुळे ही एक दिवसाची नौटंकी आणि फुसका बार- संजय राऊत

sanjay raut

मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. आज राज्यात कोणतेही आंदोलन झाले नसून शांतता असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे. राऊत म्हणतात “आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे.”

ते याबाबत मुंबई माध्यमांशी बोलत होते. “मनसेचं आंदोलन कुठे दिसलच नाही. कारण राज्यात भोंग्यांवरुन आंदोलन करण्याची स्थिती नाही. त्यामुळे जो विषयच अस्तित्वात नाही अशा विषयांवर कसं आंदोलन करताय?”, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला आहे.

राऊत यांना मनसेच्या आंदोलणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मनसेचं आंदोलन कुठे दिसूनच आलं नाही. त्यामुळे ही एक दिवसाची नौटंकी आणि फुसका बार आहे, असं म्हणत त्यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. ‘काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात,’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, ‘नाटक-सिनेमा ही आमची संस्कृती नाही. आम्ही भजन-कीर्तनात दंग असतो. तुम्ही आमचे कार्यक्रम बंद करणार का? सरकार नियमानुसार वागत असेल, तर त्यांना नियमानुसार वागू द्या. कुणीतरी अल्टिमेटम देतोय म्हणून हे राज्य चालणार नाही”, असंही राऊत म्हणाले.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी जहरी शब्दात राज यांना सुनावले आहे.

राऊत म्हाणाले, राज यांनी पुन्हा बाळासाहेब ठाकरेंच्या भुमिका तपासायला पाहिजेत. बाळासाहेबांचा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, बाळासाहेबांनी रस्त्यावरचे नमाज बंद केले, बेकायदेशीर भोंगे बंद केले तसंच तुम्हाला अजून काही बाळासाहेबांचा भाषणाच्या कॅसेट पाठवतो म्हणजे त्यांची भुमिका कळेल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यामुळे महाविकास आघाडी राज ठाकरेंना निश्चितच तुरुंगात डांबेल, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
‘तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, ‘ सोशल मिडियावर वसंत मोरेंच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस
भोंग्याचे ‘राज’कारण : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ ट्वीट; पहा व्हिडिओ
जिथं अनाज तिथं जय हनुमान! …म्हणून मनसेने मानले मुस्लिमांचे जाहीर आभार; वाचा नेमकं काय घडलं

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now