मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने (ED) काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल असून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या याच टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहेत.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत यांना भाजपा नेते किरीय सोमय्या यांनी केलेल्या टिकेबाबत विचारले असता राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. “सोमय्याांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही,” असे म्हणत राऊत यांनी त्यांना लक्ष केले.
तसेच पुढे भाजपला लक्ष करताना राऊत म्हणाले, “एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचं हे राम म्हणावं लागेल”, अशा शब्दांत राऊतांनी भाजपावर तोफ डागली.
दरम्यान, श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावीच लागेल”, असा इशारा देतानाच ईडीची कारवाई ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘ठिकाणी भाजपाची सत्ता नाही तिथंच ईडीच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. एखाद्या राज्यात हरलो असेल तर ज्यांनी पराभव केला त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे,’ असे म्हणत त्यांनी भाजपने केलेल्या करवाईवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आता दिलीप वळसे पाटलांची विकेट पडणार? जयश्री पाटलांनी सदावर्तेंच्या कानात काय सांगितलं? चर्चांना उधाण
२०० रुपयांसाठी क्रिकेट खेळणारा आयपीएलमुळे झाला करोडपती, वाचा नवदीपच्या संघर्षाची कहाणी
पोलीस भरतीची तयारी करणारा ‘डॉन’ कसा बनला? वाचा ‘झुंड’ मधील अंकुशची कहाणी
इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून व्हावे लागणार पायउतार, ‘हा’ नेता होणार पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान