Share

..तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करू, ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत मोठे वक्तव्य

sanjay raut

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने (ed) जप्त केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये जमिनीचे ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे.

या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत चांगलेच आक्रमक झाले. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे  टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले,  ‘या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले. तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं संजय राऊत यांनी म्हंटले.

दरम्यान, ‘गेल्या वेळी जे ५५ लाखांचे कर्ज जमा केले त्या कर्जाची माहिती शपथपत्रात नमुद केली आहे. पण त्यांनी माझ्यावर आणि राज्यातील इतर मंत्र्यांवर कारवाई करुन त्यांनी स्वत:ची कबर खोदायला सुरुवात केली असल्याचा गर्भित इशारा राऊत यांनी दिला आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय? एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कौटुंबिक कार्यक्रमात मी फारसा हजर नसतो पण…; आदेश आणि सुचित्रा बांदेकरच्या मुलाची पोस्ट चर्चेत
अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस ठोकणार रामराम? थेट पक्ष नेतृत्वावरच टाकला बॉम्ब, उडाली एकच खळबळ
बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप होऊनही बाहुबली प्रभासला मिळाली हॉलिवूडची ऑफर; बनणार सुपरहिरो?
मुंबई इंडियन्सने आपल्याच पायावर मारला दगड; ज्याला सोडलं, तोच घालतोय धुमाकूळ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now