ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक त्यांच्यावर आक्रमक झाले असून सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहे. (sanjay raut slams kirit somaiya over his allegation on winery)
राऊत कुटूंबियांचे वाईन उद्योजकासोबत करार झाले आहे, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्या फक्त आरोप करत नाही, तर पुराव्यासह दाखवतो असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी कागदपत्रेही सादर केले आहेत.
याचाच धागा पकडत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली. ‘आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी आमच्या नावावर असेल, तर मी सोमय्यांच्या नावावर करुन द्यायला तयार आहे.’
कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?’ असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो गुन्हा आहे का? कुणी काही व्यवसाय करत असेल, कुणी काम करत असेल, बँकांना लुबाडणे आणि चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा काबाड-कष्ट करणे कधीही चांगले. भाजपचे लोकं काहीही बोलतात, असे राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, याआधीही सत्ताधारी पक्षातील नेते गांजाला हर्बल गांजा, हलका गांजा म्हणत होते. यावेळी तेच वाईन म्हणजे दारु नव्हे असे म्हणताय. मग वाईन म्हणजे नक्की काय आहे? असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला होता. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोपही केले.
संजय राऊत यांच्या कुटूंबाने वाईन उद्योगातील मोठ्या कुटूंबाशी पार्टनरशिप सुरु केली आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यांचा उद्योग फक्त पैसे गोळा करणं हाच आहे. महाराष्ट्राला तुम्ही मद्यराष्ट्र केलं. वाईन व्यवसायिक अशोक गर्ग यांच्याशी पार्टनरशिप कधी केली? असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल
नथूराम गोडसे मर्द असता तर महात्मा गांधीऐवजी जिनाला गोळी घातली असती – शिवसेना
‘किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल’
फक्त नऊ वर्षाचा असणारा ‘हा’ मुलगा आहे अब्जाधीश, खेळण्यासाठी वापरतो करोडोंच्या गाड्या अन् प्रायव्हेट जेट






