राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘औरंगजेबाला याच मातीत गाडलं, आता त्याच्या भक्तांनाही कबरीत पाठवू,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
याबाबत ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्राला खिजवणाऱ्या आणि राजकारण करू पाहणाऱ्या त्याच्या भक्तांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू, असे वक्तव्य राऊत यांनी केले. यावेळी राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
पुढे राऊत म्हणाले, ‘राज्याला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे, यामधून अशांतता निर्माण करायची, असे या ओवेसी बंधूंचे राजकारण दिसते,’ असे म्हणत राऊत यांनी निशाणा साधला. ‘मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांना बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे,’ असं राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर औरंगजेब २५ वर्षे लढत राहिला. तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असा गर्भित इशारा राऊत यांनी दिला आहे. ‘औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता’, असही त्यांनी म्हंटलं आहे.
याचबरोबर यावर शिवसेनेच्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील टीका केली आहे. “खुल्ताबादमधील इतर दर्ग्यांमध्ये लोक जातात, पण त्या ठिकाणच्या औरंगजेबच्या कबरीचं दर्शन कोणीही घेत नाही. आज एमआयएम वाल्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. यामधून काहीतरी नवीन राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘वेळ आली आहे बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’, तरुणाच्या आक्षेपार्ह ट्विटवर आव्हाड संतापले
नितेश राणेंच खुलं आव्हान; “पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…”
कंगना आता थेट बॉलिवूडवरच बरसली; म्हणाली, ईद पार्टीत सगळ्यांनी धाकडचे कौतुक केले पण..
अभिनेता सोहेल खानचा पत्नी सीमाला घटस्फोट; २४ वर्षांपुर्वी पळून जाऊन केले होते लग्न