Share

गोपीचंद पडळकरांनी सेनेच्या ढाण्या वाघाला दिलं खुलं आव्हान; ‘माझ्यासारखं महाराष्ट्रात फिरून दाखवा…’

raut sanjay

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आता चांगलाच राजकीय विषय बनला आहे. द काश्मीर फाइल्स’वरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट खरोखरच उत्तम असून मागील ३२ वर्षांपासून खदखदत असणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या वेदना उत्तमपणे मोठ्या पडद्यावर साकारल्याचं कौतुक केलं जातं आहे.

तर दुसरीकडे निवडणुकीच्या मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका भाजपवर करण्यात येत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन सुरु असलेले वादविवाद थांबायला तयार नाही. राज्याच्या राजकीय वर्तुळात देखाल ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

अशातच अलीकडेच ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर टीका केली होती. मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात, असा रोखठोक सवाल राऊत यांनी केला होता.

याचाच धागा पकडत आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊत यांना लक्ष केले आहे. ”जनाब राऊत जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी, कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये, अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस, मोदींनींच या धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता.” असे पडळकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पडळकर यांनी थेट राऊत यांना आव्हान केले आहे. ‘जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता, पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे की, माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा, असे चॅलेंज पडळकर यांनी दिले.

दरम्यान, पडळकर आणि संजय राऊत यांच्यातील वाद काही संपण्याचे नाव घेत नाहीये. राज्यात भाजपला डावलून ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून पडळकर हे सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवर देखील निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या
‘छत्रपतीं’बाबत तडजोड नाहीच! चिन्मय मांडलेकरने न्यूज अँकरची बोलती केली बंद, व्हिडिओ व्हायरल
बिल्डरने पोलीसालाच धमकावले; नितीन नांदगावकरांचा फोन जाताच आला वठणीवर; पहा व्हिडीओ
बांगलादेशला धूळ चारत भारताचा मोठा विजय; वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता सुकर
‘अमिताभसारखा मोठा सेलिब्रिटी आंबेडकरांच्या पाया लागतो हे भाजपच्या लोकांना खटकलंय का?’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now