Share

शिवसेना – मनसे वाद पेटला! तुम्ही मशिदींमधील मौलाना आहात का? पोस्टरबाजीतून मनसेचा राऊतांना सवाल

sanjay raut
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकीकडे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे अलीकडे शिवसेना विरुद्ध मनसे पोस्टर वॉर चांगलाच रंगला आहे.

सध्या शिवसेना – मनसेत पोस्टरमधून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. याला निमित्त ठरले मशिदींवरील भोंग्यांवरील राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका. शुक्रवारी नाशिक मध्ये बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना महाराष्ट्रातील असदुद्दीन ओवैसी म्हणून डिवचले होते.

त्यानंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. याच मुद्द्याला धरून मनसेने आज थेट दैनिक सामनाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर बाजी करत राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. मनसेचे प्रभादेवी आणि मोहीम येथील पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सामना कार्यालयासमोर बॅनर लावले आहे.

बॅनरमधून त्यांनी संजय राऊतांना जुन्या वादाची आठवण करुन दिली आहे. ‘ओबीसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा? तुम्ही मशिदींमधील मौलाना आहात का,’ असा संतप्त सवाल करत मनसेने पोस्टरबाजीतून उपस्थित केला आहे. यामुळे आता सेना – मनसे यांच्यातील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

दरम्यान, मनसेच्या स्थापनेच्यावेळी राऊत स्वत: राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी राऊत यांची गाडी पलटी केली होती. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा ही मनसैनिकांनी या पोस्टरबाजीत दिला आहे.

काय आहेत पोस्टरमध्ये? ‘तुम्ही ओवेसी कोणाला बोलता? संजय राऊत तुमचा कर्कश्श भोंगा बंद करा, याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला होतोय, नाहीतर मनसे स्टाइल तुमचा भोंगा बंद करू, असा सूचक इशाराच मनसेने दिला आहे. राऊत यांची गाडी पलटी केल्याचा फोटो आणि त्याच्या खाली या चे पुन्हा वृत्ती हवी का? असा सवाल मनसेने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now