sanjay raut shocking statement on babasaheb ambedkar | शिवसेना खासदार संजय राऊत हे नेहमीच वेगवेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सुद्धा सापडतात. अशात त्यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळच चुकवले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनी सुद्धा त्यांना धारेवर धरले आहे. सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या या विधानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
लो कर लो बात… सर्वज्ञानी संजय राऊतजी म्हणताहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांचं अज्ञान यातूनच कळतं. संजय राऊत ज्या ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांचं आंबेडकरांवर कधी प्रेम होतं? संजय राऊत कंपाऊंडरकडूनच औषध घेतात, असे भाजप नेते अतुल भातखळखर यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, कुठलाही सुसंस्कृत माणूस आपली चूक दुरुस्त करेल आणि माफी मागेल, पण संजय राऊतांकडू अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण ते मीडियाशी बोलतानाच शिव्या देतात आणि नंतर नैतिकतेचे धडे देतात. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याच्या योग्यतेचे ते राहिलेले नाही.
महत्वाच्या बातम्या-
लोकांच्या घराला रंग मारून बापाने पोराला मोठे केले; आज मुलगा करोडोत खेळतो अन् फॉर्च्युनरमध्ये फिरवतो
२१८ रुपये महीना पगारावर काम करणारा इंजिनीअर कसा बनला ५ हजार कोटींच्या कंपनीचा मालक? वाचा प्रेरणादायी कहाणी..
सिराज – कुलदीपने मोडले बांगलादेशचे कंबरडे; बांगला फलंदाजांना अक्षरश नाचवले