राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात देखील उमटू लागले आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून यावर भाष्य करत भाजपावर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखंड भारताच्या मुद्यावरुन एक मोठे विधान केले आहे. भागवत म्हणाले की, ‘सनातन धर्म हे हिंदू राष्ट्र आहे. 15 वर्षात भारत पुन्हा अखंड भारत बनेल. आपण हे सर्व आपल्या डोळ्यांनी बघू. संतांच्या वतीने ज्योतिष शास्त्रानुसार 20 ते 25 वर्षात भारत पुन्हा अखंड भारत होईल, असे ते म्हणाले.
भागवत यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी निशाणा साधला आहे. पूर्वी रामनवमीच्या शोभायात्रेत फक्त धर्म आणि संस्कृतीचेच प्रदर्शन असे. आता अशा शोभायात्रेत तलवारी नाचवल्या जातात. अशातच भागवत यांनी १५ वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र होईल, असे सांगितले आहे. त्याची ही सुरुवात आहे काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी आजच्या ‘रोखठोक’मधून अनेक राजकीय विषयावर परखड मत व्यक्त केले आहे. “राज्यात मशिदींवरील भोंग्यांचे, तर देशात इतरत्र रामनवमीच्या दंगलींचे राजकारण सुरू आहे. धर्मांधतेची आग लावून, शांततेला चूड लावून कुणाला निवडणुका जिंकायच्याच असतील तर ते देशाच्या दुसऱ्या फाळणीचे सुरुंग स्वतःच्याच हाताने पेरताना दिसत आहेत,” असे ते म्हणाले.
‘देशाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण धार्मिक विद्वेष निर्माण करून निवडणुका जिंकायच्या’ असे धोरण भाजपासारख्या पक्षाने उघडपणे स्वीकारले आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊतांनी रोखठोक’मधून भाजपवर केला आहे. मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख देखील राऊत यांनी केला आहे.
तसेच अयोध्येतील राममंदिराच्या लढय़ातून ज्यांनी पळ काढला ते आता रामाच्या नावावर तलवारी काढत आहेत, याला हिंदुत्व म्हणता येणार नाही, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान, आता राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येतीये हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
झोपेच्या गोळ्या देऊन उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टर करायचा बलात्कार, २३ वर्षांनी असा झाला खुलासा
दिराशी असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी छोट्या बहिणीचे लावून दिले त्याच्याशी लग्न, असा झाला खुलासा
रणबीर कपूरला लग्नात सासूकडून मिळाले तब्बल एवढ्या कोटींचे गिफ्ट, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
खांद्यावर भगवी शाल, हातात गदा, हनूमानाची आरती; राज ठाकरेंचे हे रुप शिवसेनेला धडकी भरवणार?