Share

sanjay raut : …तर नारायण राणे ५० वर्षांसाठी तुरूंगात जाणार

Narayan Rane

sanjay raut on narayan rane  | केंद्रीयमंत्री नारायण राणे हे अनेकदा नेत्यांवर टीका करताना दिसून येत असतात. त्यांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा मार्ग मोकळा करत आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर आता संजय राऊतही नारायण राणेंवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मी नारायण राणे यांची सगळी आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते ५० वर्षे तुरुंगातून सुटणार नाहीत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

नारायण राणे म्हणताय की मी संजय राऊतांना तुरुंगात जाण्याचा मार्ग मोकळा करतोय. मला पुन्हा तुरुंगात जावे लागले तर मी तयार आहे. मी ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारा नेता नाही. धाडसाच्या गोष्टी कोण करत आहे? मी राणेंवर काही बोललो नाही कारण आधी ते आमचे सहकारी होते, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी मला तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देऊ नयेत. त्यांना धमक्या द्यायच्या असतील तर राजवस्त्र बाजूला ठेवून या. राणेंनी माझ्या नादाला लागू नये. मी ईडीने चौकशीला बोलावले म्हणून शरणागती पत्कारली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच जे जे नेते मला तुरुंगात धाडण्याची भाषा करत आहे. त्यांच्या वक्तव्य मी नोंद करत आहे. त्या सगळ्या नोंदी मी सरन्यायाधीशांकडे पाठवणार आहे. नारायण राणेंची सगळी आर्थिक प्रकरण बाहेर काढायची ठरवली तर ते ५० वर्षे तुरुंगातून बाहेर येणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या निशाण्यावर आले आहे. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर यावर सुनावणी होईल. न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून कोर्ट कोणता निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आधी त्याच्यासोबत केला डान्स अन् मग स्टेजवरच केले किस; गौतमी पाटीलचा व्हिडीओ आला समोर
वाघाचा ट्रेनरवर हल्ला, आधी खाली पाडलं मग जबड्यात पकडली मान अन् मग…; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
riteish deshmukh : रितेश देशमुख झाला भावूक, म्हणाला, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करणं म्हणजे..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now