सकाळपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. तसेच राऊतांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘ईडी आणि ईडीचे अधिकारी हे भाजपचे एटीएम मशीन बनले आहे. याबाबत मी 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये नुसता कचरा नाही तर भ्रष्टाचार सुद्धा साफ करायचा आहे, असे संजय राऊत पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.
तसेच ज्या ईडी ला तुम्ही सगळ्यांच्या विरोधात लावलं आहे. या संदर्भात दहा भाग मी त्यांना देणार आहे. हा आजचा एक भाग असल्याचे देखील राऊत म्हणाले. ‘केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ईडी आणि आयटीच्या धाडी सुरू असून त्याचा उद्देश हा केवळ सरकार पाडणे असा आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
ते म्हणाले, ‘ईडी (ED) आणि त्यांचे काही अधिकारी भाजपची (BJP) एटीएम मशीन झाले आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत, अशी घोषणा राऊत यांनी केली. याचबरोबर राऊत यांनी यावेळी या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती दिली.
दरम्यान, ‘आज मी सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले असल्याचे राऊत म्हणाले.
‘आमच्या घरात महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली मात्र भाजपच्या लोकांवर मात्र कारवाई का होत नाही. आयकर विभागाची ही भानामती सुरू आहे, त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
मला जे सांगायचे होते ते मी.., झुंडच्या वादावर नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हटवला युक्रेनमधील ‘हा’ येशूचा पुतळा, वाचा यामागचे मुख्य कारण
PHOTO: कोण आहे सपना भाभी जिच्या हॉट फोटोंनी सोशल मिडीयावर घातलाय धुमाकूळ?
दोन महिलांसोबत एकाचवेळी मसाज घेत होता शेन वॉर्न, CCTV फुटेज आले समोर