Share

यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये मातोश्रीचा उल्लेख सापडल्यानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले..

sanjay raut

गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली होती.

यामध्ये काही व्यवहारांसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येत होते. जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीतील काही गोष्टींमुळं वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यावरुन आता चांगलेच राजकारण तापले असून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. जाधव यांच्याकडील डायरीमध्ये असलेल्या मातोश्रीच्या उल्लेखाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. याचबरोबर महाराष्ट्रात दान, धर्म करण्याची परंपरा आहे. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. शिवसेनेत डायरी लिहिण्याची परंपरा नाही. ऐकून आम्हाला गंमत वाटली,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही, असे राऊत यांनी स्पष्ट करताना पुढे सांगितले की, डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावं आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही.’

दरम्यान, यशवंत जाधव यांची डायरी प्राप्तिकर विभागाला सापडली होती. त्यामध्ये मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिले. तसेच दोन कोटी रुपये दानधर्मासाठी दिले, असा उल्लेख होता. तसेच त्यावर स्पष्टीकरण देताना जाधव यांनी आपण आपल्या आईला ही रक्कम आणि घड्याळ दिल्याचा दावा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या
‘आमचा एकच दणकट बसला की आईचं दुध आठवेल’, शिवसेना आमदाराचा काँग्रेस-राष्ट्रवादीला घरचा आहेर
गावसकर-मॅथ्यू हेडन यांची भविष्यवाणी ठरणार खरी? आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये दिसणार ‘हे’ संघ
..त्यामुळे मी बॉलिवूडपासून दुर गेले होते, ‘रॉकस्टार’ फेम नरगिस फाखरीने केला मोठा खुलासा
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now