Share

sanjay raut : वेदांता महाराष्ट्राच्या हातून निसटला अन् राऊतांच्या शेवटच्या ‘त्या’ विधानाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली

sanjay raut

sanjay raut : शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. राजकीय घडामोडींवर दररोज नियमित भाष्य करणारे राऊत सध्या गोरेगाव पत्र्याचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. यामुळे शिवसेनेच्या गोटात सध्या अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.

असं असलं तरी देखील सध्या राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याची राज्यात तुफान चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मिडियावर संजय राऊत हे चांगलेच चर्चेत आहेत. तर दुसरीकडे सध्या गेल्या दोन – तीन दिवसांपासून एक विषय चांगलाच गाजतोय तो म्हणजे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे स्थलांतर..!

सध्या राज्याच्या राजकारणात फॉक्सकॉन प्रकल्पावरून वाद सुरू आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारवर अनेकांकडून टीका केली जात आहे. महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

सध्या या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांचे एक वक्तव्य सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे. तसं पाहायला गेलं तर राऊत हे सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेलं नाहीये.

मात्र तरी देखील राऊत यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. दीड महिन्यांपूर्वी पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली आणि पोलीस त्यांना घेऊन जात होते. तेव्हा राऊतांनी एक सूचक विधान केलं होतं की, “पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय.” सध्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या अनेक कट्टर समर्थकांनी सोशल मिडियावर राऊत यांचे वक्तव्य शेअर केलं आहे. विशेष बाब म्हणजे राऊत यांचे वक्तव्य आता सत्यात उतरत असल्याचं बोललं जातं आहे. सध्या राऊत यांचे समर्थक त्यांना मिस करत आहेत. कारण सध्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करायला राऊत नाहीये.

महत्वाच्या बातम्या
Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार
sharad koli : आदित्य ठाकरेंनी या खास माणसावर सोपवली मोठी जबाबदारी, गद्दारांना शिकवणार धडा
Sharad Koli : ;तानाजी सावंत असो किंवा शहाजी पाटील असो, त्यांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही’’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now