Share

महागाईवरून संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, ‘युक्रेनचं राहू द्या, महागाईवर बोला..’

सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदींपासून भाजपचा एकही नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घरगुती सिलेंडरचे भाव प्रचंड वाढले आहेत. आता 999.50 रुपयांवर सिलेंडरचे दर पोहोचले आहेत. यावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. नरेंद्र मोदींपासून भाजपचा एकही नेता सिलेंडरच्या वाढत्या किंमतीवर बोलायला तयार नाही असे संजय राऊत म्हणाले.

यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, घरगुती गँस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी अधिक वाढली आहे. सध्या सिलेंडरची किंमत 999.50 रुपये एवढी झाली आहे. 22 मार्चला सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली होती. असे संजय राऊत यांनी लिहिले.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले, मशिदींच्या मुद्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला आहे. कीर्तन आणि जागरणांना बसला आहे. सुदैवाने राज्यातील जनतेने याला किंमत दिली नाही. काही लोकांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला. पण या राज्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम होतं. त्यामुळे दंगली करणाऱ्या आणि हिंदू-मुस्लीम दंगे घडवणाऱ्यांना धडा मिळाला आहे.

तसेच नरेंद्र मोदींवर देखील त्यांनी टोला लगावला. म्हणाले, पंतप्रधान मोदी युरोपात जाऊन रशिया आणि युक्रेनबद्दल भाष्य करतात. त्यांना या देशांची चिंता आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्ती करत आहेत. यावर त्यांचे भक्तही वाह वा करत आहेत. पण देशातील जनता बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे. सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.

कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता 14.2 किलोंच्या घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. जुलै 2021 पासून तब्बल 5 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now