भाजप आणि शिवसेना मधला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. उद्या शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, या पत्रकार परिषदेला पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले. (sanjay raut give warning to bjp)
याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. भाजपचे नेते हा नेता जेलमध्ये जाईल, तो नेता अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत असेल, असे म्हणत आहेत. पण पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील, असे भाकीत राऊत यांनी केले आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप सुरू आहे. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतंय ते बघा, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला आहे.
तसेच हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, असे म्हणत राऊत यांनी चांगलाच भाजपचा समाचार घेतला आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असे देखील राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर खोटे आरोप केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापरच केला जात नाही तर त्यांच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे संबंधित यंत्रणा बदनामही होत आहेत. ही चुकीची माहिती पसरवणाऱ्या ‘सिरीयल लायर्स’ना लवकरच कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून भाजपावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. आता उद्या होणाऱ्या राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पतीच्या आठवणीत प्रज्ञा सातव भावूक; ‘राजीवजी.. तुम्ही जिथे असाल, तुम्हाला एकच सांगते…’
प्रियांका चोप्राने सासरच्या पार्टीला पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा, पहा फोटो
भयंकर! घरात घुसलेल्या चोराला पकडून दिला विजेचा शॉक, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा