sanjay raut first reaction | गेल्या १०० दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत न्यायालयीन कोठडीत होते. अखेर पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसैनिक सुद्धा खुप आनंदात असून अनेक राजकीय नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. त्यावेळी संजय राऊत कोठडीत असल्यामुळे त्यांना त्यांच्याशी थेट बोलता आले नाही. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचवल्या आहे. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटीन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनी लाँड्रींग प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. ते तब्बल १०० दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये होते. आताही ईडीने मुदत वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे.
जामीन मंजूर होताच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन केला होता. पण त्यावेळी संजय राऊत हे कोठडीमध्येच होते. त्यामुळे शिवसेनेच्या एकापदाधिकाऱ्याने फोन उचलला होता. त्यावेळी त्यांनी त्याला सांगितले की, संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटीन. त्यावर संजय राऊतांनीही धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्राचाळ प्रकरणी केलेल्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊतांवर होता. त्या प्रकरणात त्यांनी प्रवीण राऊत यांची साथ दिली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. त्यामुळे गेल्या १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. मात्र आज कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. १०० दिवसांनंतर बाहेर आलो आहे. बाहेर काय चाललंय याची माहिती मिळत नव्हती. शिवसेनेचा कणा मोडलेला नाही. मी लढणारा शिवसैनिक असून अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेलं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, एकच शिवसेना खरी आहे. ती बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची आहे. बाकी सर्व धोत्राच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र आणि मुंबई कोणाच्या मागे उभी आहे हे कळेल. गेल्या ३०-३५ वर्षांपासून भगवा महापालिकेवर फडकत आहे. त्या भगव्यात बाळासाहेबांनी खुप तेज निर्माण केले आहे. आता तर आमच्या हातात मशाल आहे.
महत्वाच्या बातम्या-
krupal tumane : राज्यात राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा पडणार मोठे खिंडार, तब्बल आठ…
जिच्यावर विश्वास टाकला तिनेच धोका दिला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात सामील
Sambhaji Bhide : भिडे गुरुजी म्हातारे वाटले म्हणून मुर्तींनी नमस्कार केला, त्या भिडेंना ओळखतही नाहीत; आयोजकांचा दावा