राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र शाहू छत्रपती महाराजांनी भाजपवरच गंभीर आरोप केले.
‘उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेलं नाही,’ असं शाहू छत्रपती महाराजांनी काल स्पष्ट सांगितलं.
याचाच धागा पकडत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, ‘शाहू छत्रपतीनी शिवसेनेला बदनाम करण्याचा फडणवीस आणि कंपनीने सुरू केला त्यांचा मुखवटा फाडला, कोल्हापूरच्या भूमीमध्ये अजूनही सत्य आणि प्रमाणीकपणा असल्याच राऊत यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, ‘शाहू महाराजांचं वक्तव्य आंबाबाईने दिलेला आशिर्वाद आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी संभ्रम दूर केला,’ असंही राऊत यांनी म्हंटले आहे. याचबरोबर पुढे बोलताना राऊत यांनी भाजपवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. भाजपने कारस्थान केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
तसेच ‘भाजपने कारस्थान केलं, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी संभीजीराजेंचा गैरवापर केला पण शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला,’ असे संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे यावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया आली आहे. फेसबुक पोस्ट करत संभाजीराजे यांनी यावर भाष्य केलं.
फेसबुक पोस्टमध्ये संभाजीराजे म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही,’ असं संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं आहे. तर आता संभाजीराजेंच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
यंदाच्या महापालिका निवडणूकीत भाजपलाच अच्छे दिन, शिवसेनेला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा
जीवनावश्यक वस्तू फक्त त्याच व्यवसायिकाकडूुन खरेदी करेल, जो हिंदू धर्माचा…; हिंदू महासंघाने घेतली शपथ
मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका