राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्यांवरून चांगलेच तापले आहे. एकीकडे भोंग्यावरुन आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधकांवर टिकास्त्र सोडलं आहे. याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना देखील राऊतांनी लक्ष केलं आहे.
राऊत यांची पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. या सभेत राऊतांनी आपल्या स्टाईलनं विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. यावेळी कोल्हापूरच्या महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष केलं. अब चंपाकली मुरझायी हैं,कोल्हापुरातही पराभव झाला, त्यांना तिथेही जागा नाही, असा टोला राऊतांनी पाटलांना लगावला.
पुढे बोलताना राऊत यांनी भोंग्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘गेल्या 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे,’ असं म्हणत राऊत यांनी थेट राज ठाकरेंवर जहरी शब्दात टीका केली.
राऊत यांनी या सभेदरम्यान बोलताना आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ‘अनेक लोक पेटवापेटवीची भाषा करत आहेत. कोणी करायची पेटवापेटवीची भाषा, आमचं आख्खं आयुष्य पेटवापेटवीत गेलं. मात्र सवाल ये नही की बस्तीयां क्यो जली गई, सवाल ये है की बंदर के हाथ मे माचिस किसने दिया. बरं माचिस देऊनही ते पेटायला तयार नाही.’
पुढे बोलताना राऊत यांनी सवाल उपस्थित करत विरोधकांची कोंडी केली. ते म्हणाले, ‘शिवसेनेकडं दारुगोळा असताना कसा काय पेटणार? असा सवाल उपस्थित करत ‘पेटण्यासाठी आतून आग असावी लागते, मनगटात धग असावी लागते’, असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, ‘बाळासाहेबांची कला पुढे जाईल असे आम्हाला वाटले होते पण भाजपाने व्यंगचित्र कलेचा गळा घोटला आहे, असे राऊत म्हणाले. ‘हा महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही, हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे,’ असं म्हणत राऊत यांनी हल्लाबोल चढवला.
महत्त्वाच्या बातम्या
सलमान खानने लग्न का केले नाही? प्रत्येक वेळी ब्रेकअप का होतात? वडील सलीम खान यांनी सांगितले खरे कारण
कारमध्ये असताना मुस्लिम परिवाराने जिंकले अनुपम खेर यांचे हृद, व्हिडीओ होतोय व्हायरल
मी पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय, त्यामुळे…; भोंगे आंदोलनावर वसंत मोरे स्पष्टच बोलले
पंतप्रधान म्हणून कोण चांगलं असेल? शरद पवार की उद्धव ठाकरे? श्रीकांत शिंदेंनी दिले ‘हे’ उत्तर