गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर शाब्दिक निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले,’केंद्रीय यंत्रणाकडून दबाव टाकून सरकार पाडण्याचा हा डाव आहे. देशात सर्वाधिक ईडीच्या कारवाया म्हाराष्ट्रात झाल्या आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील ठराविक लोकांना केंद्रीय यंत्रणेकडून लक्ष्य का केले जाते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? असा सवाल करत भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेलाही धाडी टाकण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त धाडी कशा पडत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. सरकार पाडण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत, असा आरोप राऊत यांनी ईडीवर केला आहे.
‘आमच्या घरात महाराष्ट्रात जर कोणी घुसत असेल तर शिवसेनेला देखील दुसऱ्यांच्या घरी धाडी टाकण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली मात्र भाजपच्या लोकांवर मात्र कारवाई का होत नाही. आयकर विभागाची ही भानामती सुरू आहे, त्याचा खुलासा लवकरच आम्ही करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, पुढे बोलताना राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना लक्ष केले, ते म्हणाले, ‘किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट आहेत. भाजपकडून ईडीच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जात आहे. ईडिकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दोन महिलांसोबत एकाचवेळी मसाज घेत होता शेन वॉर्न, CCTV फुटेज आले समोर
शेन वॉर्नचा ‘तो’ अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट, चाहते देखील हळहळले
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार, ‘हा’ पक्ष मारणार बाजी, देशबंधू एक्झिट पोलमधून खुलासा
मनाला वाटेल तसं वागता येणार नाही! BCCI चा हार्दीक पांड्याला दणका; दिले ‘हे’ आदेश