Share

नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड, तरी त्यांना का वाचवलं जातय? आता भाजप गप्प का?

खासदार नवनीत राणा दाम्पत्याच्या दाऊद गँगशी (डी गँग) संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. याबाबत ट्विट करत भाजपला संतप्त सवाल देखील उपस्थित केला आहे. राऊतांनी नवनीत राणा यांच्याबद्दल एक खुलासा करत आणखी खळबळ उडवून दिली आहे.

ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडवाला याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतले, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. तसे राऊत यांनी थेट पुरावेच फोटो सहीत प्रसिद्ध केले आहेत. याबाबत राऊत यांनी केलेल्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

युसुफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. डी गँगचा फायनान्सर लकडावालाशी राणांचे संबंध असल्याचा एक पुरावा राऊत यांनी समोर आणला आहे.

पुन्हा एक फेसबुक पोस्ट करत राऊत यांनी भाजपला लक्ष केलं आहे. युसुफ लकडावाल्याला ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती, युसुफ लकडावाला याचा जेलमध्ये मृत्यू झाला. तसेच युसूफच्या अवैध कमाईचा वाटा अजूनही नवनीत राणा यांच्या खात्यात आहे. त्यामुळे राणा ईडीचा चहा कधी पिणार? या डी गँगला का वाचवलं जातंय? भाजप का शांत आहे? असे सवाल ट्विटमधून राऊत यांनी उपस्थित केले आहे.

दरम्यान, दरम्यान, तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी राऊत यांच्याविरोधात नागपुरात पोलिसात तक्रार केली आहे. नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला उद्देशून 20 फूट खड्ड्यात गाडण्याची आणि स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा केली होती.

त्यानंतर आत राऊत यांच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याच बोललं जातं आहे. ‘जीवे मारण्याची धमकी आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार, नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला
नवाजुद्दीन सिद्दीकीला बदलायचंय बॉलिवूडचं नाव, म्हणाला, ‘मला ‘या’ तीन गोष्टी मुळीच आवडत नाहीत’
भोंग्यांच्या वादात आता सुरेश वाडकरांची उडी, म्हणाले, ते त्यांच्या धर्माचे काम आहे, आपण आपला..
प्रसिद्ध अभिनेत्रीची आई गंभीर आजारी, ICU मध्ये उपचार सुरू; अभिनेत्रीने चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now