आज शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले आहे. याच दरम्यान राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, असे राऊत म्हणाले आहेत.
यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे, असेही राऊत म्हणाले. राकेश वाधवान आणि किरीट सोमय्यांचा मुलगा पार्टनर आहेत. निकॉन इन्फ्रा कोणाची आहे हे मला विचारायचे आहे? ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे, असा आरोप राऊतांनी केला.
दरम्यान, कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार. हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार.उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल. जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे, असे राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
भावासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या बहिणीचा भयानक अंत, रस्त्यावर आपटून गेला जीव
“महाराष्ट्र आमच्या बापाचा कितीही नामर्दानगी करून पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही”
आनंद महिंद्रांच्या मोठ्या खेळीने टाटा, मारुती सुझुकी, ह्युंदाईला बसणार झटका; वाचा सविस्तर..
…तर मी ‘त्या’ दलालाला जोड्यानं मारेन; संजय राऊत किरीट सोमय्यांवर बरसले