Share

भाजपने कोल्हापूरात उमेदवार उतरवल्यानंतर राऊत संतापले, भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी…

sanjay raut

राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत.

तर दुसरीकडे भाजपकडून तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे आता राज्यसभा निवडणुकीसाठी चुरस आणखी वाढली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी अचानक तिसरा उमेदवार म्हणून भाजपने धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर केले आहे.

अशातच आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि त्यातील दोन उमेदवार शिवसेनेचेचं असतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पुढे भाजपवर टीका राऊत यांनी म्हंटलं आहे की, ‘भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींचा दुरुपयोग केला, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ‘संभाजी राजेंना भाजपकडून कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता स्पष्ट झालं आहे, असं राऊत म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजपला आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे. मात्र त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याकडे लोकशाही असून निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र कोणी घोडेबाजार करुन अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचंदेखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे,” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘आम्ही आमचा उमेदवार म्हणून कोल्हापूरचे संजय पवार यांना उतरवलं आहे. पवार यांच्या विजयाबद्दल मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खात्री आहे की, जेवढी मतं हवीत विजयासाठी त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मैदानात, ‘या’ बड्या नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी, चर्चांना उधाण
ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक; काँग्रेस हायकमांड आज घेणार मोठा निर्णय
पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now